व्यवहार मराठीत करा, मनसेने बँकांना ठणकावले

व्यवहार मराठीत करा, मनसेने बँकांना ठणकावले

मुंबई-  मनसेकडून आज वांद्रे-कुर्ला संकुलातील अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकांना पत्र देण्यात आले आहे. लवकरात लवकर बँकांचे व्यवहार मराठी भाषेत सुरु करावेत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अशा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घातला होता. बँकांचे व्यवहार मराठीत करा, नाहीतर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार, आज मनसेकडून बीकेसीमधील बँकांना पत्र देऊन व्यवहार मराठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की, बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होतो, असे राज ठाकरे म्हणाले होते.

COMMENTS