मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधानसभेतील शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा काल संसदीय कारकिर्दीचं अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल दोन्ही सभागृहात गौरव करण्यात आला. यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांचे गुणगान सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शरद पवार यांच्या कार्याचा आढावा घेताना अनेक गोष्टींचा उहापोह केला. त्यांचे अनेक गुण सांगत पवारांनी काही राजकीय चुका केल्या असल्याचंही सांगितलं. त्यांनी त्या चुका केल्या नसत्या तर आज देशातलं सर्वोच्च पद त्यांनी पटकावलं असतं असंही पवार म्हणाले.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. त्यांच्याकडे काँग्रेस पक्षातील सर्वात महत्वाची आणि अनेक पदे होती. त्यांच्यासारखा मासबेस असलेला नेता काँग्रेसमध्ये नव्हता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आजपेक्षाही मोठे झाले असते असंही पंतगराव कदम म्हणाले. पवारांची ही मोठी राजकीय चूक होती असं आपल्याला वाटतं असंही कदम म्हणाले.
शरद पवारांनी दुसरी मोठी चूक केली ती म्हणज्ये 1993 मध्ये संरक्षणमंत्रीपद सोडून महाराष्ट्रात येण्याची. त्यावेळी जरी हायकमांडने सांगितले तरी त्यांनी महाराष्ट्रात परत यायला नको होते. ते तिथेच राहिले असते तर कदाचित मोठी संधी त्यांना मिळाली असती असंही पतंगराव कदम म्हणाले.
COMMENTS