शरद यादवांची राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून उचलबांगडी !

शरद यादवांची राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून उचलबांगडी !

नवी दिल्ली –  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जाहीरपणे टीका करणारे संयुक्त जनता दलाचे (जदयू) ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे पक्षाने आज (शनिवारी)   राज्यसभेतील पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.  शरद यादव त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 

‘शरद यादव यांनी गेल्या काही काळात केलेल्या पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करणे गरजेचे होते. त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलेले नाही. फक्त त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची नियुक्ती केली आहे’, असे स्पष्टीकरण रामचंद्र प्रसाद सिंग यांनी दिले.

 

 

COMMENTS