पाटणा – महायुती तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यात धुसफूस सुरु आहे. त्यामुळे आता शिस्तभंगप्रकरणी शरद यादव यांची जेडीयून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची शक्यता आहे. पक्षादेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची सदस्यता रद्द होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या नेत्याची निवड होईल, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, शरद यादव हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
COMMENTS