शहिदांच्या कुटुंबांना आयएएस अधिकारी दत्तक घेणार

शहिदांच्या कुटुंबांना आयएएस अधिकारी दत्तक घेणार

नक्षलवादी आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देशातील आयएएस अधिकारी पुढे आले आहेत. शहिदांच्या कुटुंबांना आयएएस अधिकारी दत्तक घेणार आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलीस दलातील शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाचा 5 ते 10 वर्षांसाठी दत्तक घेऊन सांभाळ करणार आहेत. देशभरातील आयएएस अधिकारी स्‍वेच्‍छेने संघटनेच्या माध्यमातून हे मदतकार्य करणार आहेत. ज्यामुळे शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल. तसेच शासनाकडून मिळणार्‍या सोयी सुविधाही योग्य रित्या मिळतील.

2012ते 2015 मधील बॅचच्या 600 ते 700 अधिकारी या कार्यात सहभागी होणार आहेत. अधिकार्‍याची ज्या भागात नियुक्ती असेल तिथल्या किमान एका कुटुंबाला दत्तक घेण्यास सांगण्यात येणार आहे.

 

COMMENTS