शहीद जवानाच्या पत्नीला बँकेत नोकरी, पंकजा मुंडे यांची घोषणा

शहीद जवानाच्या पत्नीला बँकेत नोकरी, पंकजा मुंडे यांची घोषणा

औरंगाबाद – जम्मू काश्मिरमध्ये शत्रूशी दोन दात करत असताना शहीद झालेले औरंगाबाद जिलह्यातील केळगावचे जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबियांची काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी जाधव यांच्या कुटंबियांची विचारपुस करत त्यांचं सांत्वन केलं. शहीद संदीप जाधव यांच्या पत्नीला वैद्यनाथ बँकेत नोकरी देण्याचं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं. तसंच जाधव यांच्या दोन्ही मुलांच्या नावे 1 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉजिट करण्याचंही आश्वासन दिलं. शहीद संदीप जाधव यांचं स्मारक बांधण्याचं आणि गावात व्यायामशाळा देण्यांचही आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिलं. त्यासाठी ग्रामविकास निधीतून 25 लाख रुपये देण्याची घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली.

COMMENTS