शांततापूर्ण देशांच्या यादीत भारताची घसरण !

शांततापूर्ण देशांच्या यादीत भारताची घसरण !

नवी दिल्ली  – शांततापूर्ण देशांच्या यादीत भारताची घसरण झाली आहे.   इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अॅन्ड पीस या संस्थेने जगाला शांतीचा संदेश देणार्‍या शांततापूर्ण देशांची यादी जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या 162 देशांच्या यादीत आईसलँड या छोट्याश्या आणि कमी लोकसंख्येच्या देशाने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अव्वल स्थान मिळवले आहे. तर भारताचे स्थान घसरून 143 नंबरवर आले आहे.

भारताच्या पुढे या यादीत 16 नंबरवर भूतान, 62 नंबरवर नेपाळ, 84 नंबरवर बांग्लादेश, 114 नंबरवर श्रीलंका ही शेजारी राष्ट्रे आहेत. देशातील अपराधांचा स्तर, संघर्षमय घटना आणि सैन्यीकरण ही यादी जाहीर करताना लक्षात घेतले गेले आहेत. या यादीत युरोपमधील सहा देश आहेत. त्यात डेन्मार्क 2 नंबरवर, ऑस्ट्रीया 3 नंबरवर आहे. या यादीत पाकिस्तानचा नंबर 154 वा आहे तर अफगाणिस्तान 160 नंबरवर. या यादीत अमेरिकेचीही गतवर्षीपेक्षा पिछेहाट झाली असून अमेरिका 94 नंबरवर तर चीन 124 नंबरवर आहे. सर्वात तळात इराण आणि सिरीया देश आहेत.

 

COMMENTS