शाळांमध्ये प्रवेशबंदीला मुंबईच्या डबेवाल्यांचा विरोध

शाळांमध्ये प्रवेशबंदीला मुंबईच्या डबेवाल्यांचा विरोध

कॅन्टीनमधील पदार्थ खाऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  मुलांच्या तब्बेती बिघडू नये यासाठी शाळेत दिल्या जाणाऱ्या जंक फूडवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र दक्षिण मुंबईतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुटीमध्ये डबा पोहोचवण्याचे काम डबेवाले करतात. या शाळांनी डबेवाल्यांना हे डबे आणण्यास बंदी घातली आहे. मात्र शाळेच्या या निर्णयावर डब्बेवाल्यांनी विरोध दर्शविला आहे. ही बंदी हटवावी, अशी मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे.

मुलांच्या तब्बेती बिघडू नये यासाठी शाळेत दिल्या जाणाऱ्या जंक फूडवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र घरचा डबा पोहोचता करणाऱ्या डबेवाल्यांवर निर्बंध का घालण्यात आले आहेत, असा प्रश्न मुंबई डबेवाला संघटनेने उपस्थित केला आहे.ज्या पालकांना डबेवाल्यांमार्फत आपल्या मुलांना डबे द्यायचे आहेत त्यांना ते नेऊ द्यावेत, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

 

COMMENTS