राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनेटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देणार आहेत. तसेच शाळेतील मुलींना पाच रूपयात सॅनेटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावात एका महिला बचत गटाची निवड करण्यात येणार आहे. बचत गटांना व्यवसायास वाव मिळणार आहे. या योजनेत शासनाची गुंतवणूक राहणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुलपात्र परंतु घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या कुटुंबांना 500 चौ. फु. जागा खरेदीसाठी रू. 50 हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सुटलेला असून जर गावात जागा नसेल तर गावाबाहेर जागा घेऊन त्या ठिकाणी एकत्रित सर्व जाती धर्मांचे लोक राहणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना, ग्राम विद्युत व्यवस्थापक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आपले सरकार सेवा केंद्र, स्मार्ट ग्राम योजना, चौदावा वित्त आयोग, आमचं गाव आमचा विकास आदि योजनांचा सविस्तर आढावा मंत्री मुंडे यांनी यावेळी घेतला.
COMMENTS