शिक्षकांना जीन्स-टी शर्टवर बंदी !

शिक्षकांना जीन्स-टी शर्टवर बंदी !

लखनऊ –  उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यानाथ याचं सरकार आल्यापासून अनेक मोठ-मोठे निर्णय घेतले जात आहे. यातच आता उत्तर प्रदेशातील शिक्षकांना यापुढे जीन्स -टी शर्ट घालण्यास बंदी घातली गेली आहे.

उत्तर प्रदेशातील 158 सरकारी महाविद्यालये आणि 331 सरकारी अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना जीन्स -टी शर्ट घालण्यास बंदी घातली आहे. सर्व शिक्षक तसेच इतर विद्यापीठातील अधिका-यांनी नेवी ब्लू रंगाची ट्राउजर आणि पांढरा किंवा निळा रंगाचा शर्ट घालून, महाविद्यालात यावे लागणार आहे. असे 30 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच सर्व शिक्षक वेळेवर यावेत आणि पारदर्शकरीत्या काम होण्यासाठी सर्व सरकारी महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात येणार आहे.

याआधी सरकारी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयात पान-मसाला आणि गुटखा, तंबाखू खाण्यास बंदी घालण्यात आली होती. शिक्षणाचे संचालक आरपी सिंह म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थीसाठी आदर्श असतात त्यामुळे शिक्षकांनी शालीन कपडे परिधान केले पाहिजेत. शिक्षक जसे राहतात त्याचे अनुकरण विद्यार्थी करत असतात म्हणून शिक्षकांनी विद्यार्थीन समोर चांगला आदर्श  ठेवावा. असे आरपी सिंह यांनी म्हटले आहे.

COMMENTS