शिक्षक भरतीसंदर्भात विनोद तावडेंची महत्त्वपूर्ण घोषणा

शिक्षक भरतीसंदर्भात विनोद तावडेंची महत्त्वपूर्ण घोषणा

राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी आता यापुढे परिक्षा घेतली जाणार आहे. तसंच मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं शिक्षक भरतीसाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

राज्यात यापुढे शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीवर परीक्षा घेतली जाईल. मेरिट लिस्टप्रमाणे रिक्त जागांवर भरती केली जाईल. पहिली ते बारावीच्या शिक्षक भरतीसाठी हा नियम लागू असेल. असं तावडे यांनी सांगितले.

राज्यात 1 लाख 5 हजार अनुदानीत शाळा आहेत. राज्य सरकार 57 हजार कोटी वर्षाला शिक्षणावर खर्च करते. ओपन स्कूलची योजना राज्यभरात राबवली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येतील. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येतील. रात्रशाळेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तावडे यांनी सांगितले.

COMMENTS