मुंबई – नांदेड महापालिका निवडणुकीची भाजपची सूत्रे चक्क शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे गेली आहेत. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आणखी दोन दोन आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट राष्टवादी काँग्रसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी नवाब मलिक आले होते. तेंव्हाच त्यांनी शिवसेनेचे तीन आमदार भाजपवासी होणार असून त्यापैकी एकाकडे भाजपची महापालिकेची सूत्रे जाणार असल्याचा दावा केला होता. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे निवडणुकीची भाजपची सूत्रे गेल्यामुळे मलिक यांचा दावा काही प्रमाणात खरा ठरला आहे. आता राहिलेले दोन आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा पुनरुच्चार मलिक यांनी केला आहे. त्यामुळे ते दोन आमदार कोणते याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
COMMENTS