ठाणे – शिवसेना तसेच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची मिलीभगत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी त्याचा निषेध केला आहे. यासाठी भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात आज एक दिवसीय उपोषण केलं.
ठाणे महानगर पालिकेची नुकतीच झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली होती. परंतु भाजपच्या सदस्यांना बोलू न दिल्याचा निषेध करण्यासाठी आज पालिका मुख्यालयातच भाजपचे नगरसेवक उपोषणाला बसले. ठाण्यातील सर्वसाधारण सभेत 400 हुन अधिक प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी उपोषण करण्यात आल्याचं भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी सांगितले आहे. तर नवनिर्वाचित नगरसेवकांनीदेखील या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचेही भाजपच्या नगरसेवकांनी सांगितले आहे.
दरम्यान, यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात भविष्यात सत्ता संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
COMMENTS