राज्यात शिवसेना हाच भाजपचा नंबर एकचा शत्रू असल्याचा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. 2019 ची निवडणूक ही शिवसनेसोबत युती न करता स्वबळावर लढायची आहे. त्यामुळे कामा लागा असा सल्लाही त्यांना कार्यकर्त्यांना दिला आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांवर संपूर्ण तयारी करण्याचे आदेशही शाह यांनी दिले असल्याचं कळतंय. मुंबईत पक्षाच्या पदाधिका-यांना संबोधित करताना त्यांनी हा कानमंत्र दिला आहे. पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाअध्यक्ष, इतर पदाधिका-यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यानंतरचा अमित शाह यांचा मुंबई दौरा हा 1 नोव्हेंबरला होणार आहे. त्यावेळीही तो दौरा तीन दिवसांचा असेल. त्यामध्ये सर्व आढावा घेतला जाणार आहे.
COMMENTS