नांदेड – नांदेड महापालिका निवढणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. भाजप, काँग्रेस, शिवेसना, राष्ट्रवादी, एमआयएम आणि इतर पक्ष आपआपल्या परीने प्रचारात रंगत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काल शहरामध्ये भाजपची प्रचारसभा झाली. यामध्ये कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. विशेष म्हणज्ये नांदेडमध्ये भाजप शिवसेना वेगवेगळे लढत असताना शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या प्रचारसभेत येऊन भाजपसाठी मते मागितली. पुढचा महापौर भाजपचा होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रय़त्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं.
चिखलीकर हे शिवेसनेवर नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांच्याकडे नांदेड महापालिकेच्या प्रचाराची सूत्रेही दिली आहेत. आजपर्यत चिखलीकर यांनी पडद्यामागून भाजपची सर्व सूत्र हालवली. आता मात्र थेट भाजपच्या प्रचारसभेत जाऊन त्यांनी शिवसनेसाठी मते न मागता भाजपसाठी मते मागीतली. त्यामुळे शिवसेना हायकमांड याला आता कशा प्रकारे उत्तर देतं किंवा त्यांच्यावर कशी कारवाई करतं ते पहावं लागेल.
COMMENTS