शिवसेनेचे मराठवाड्यात 6 मे पासून शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

शिवसेनेचे मराठवाड्यात 6 मे पासून शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्यावतीने 6 मेपासून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्याशी संवाद साधणार असून शिवसेना आमदार आणि नगरसेवकही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मराठवाडय़ापासून सुरू होणाऱ्या या शिवसंपर्क अभियानांतर्गत ६ मे रोजी शिवसेना आमदार, नगरसेवक मराठवाडय़ातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन शेतकरी-ग्रामस्थांशी संपर्क साधून चर्चा करणार आहेत. तर ७ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संभाजीनगर येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत या भागातील स्थितीचा आढावा घेणार आहे.

COMMENTS