मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित राहणार आहेत. पावसाळी अधिवेशनात शिवसेनेची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवल्याचं बोललं जातंय. कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिली आहे. दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे.
Newer Post
एसटी बस स्थानकात ‘सावध राहा’ ! Older Post
छगन भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त ?
COMMENTS