डोंबिवली – डोंबिवलीत कचरा प्रश्नावर शिवसेनेने गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. पूर्वेकडील एका प्रभागातील पालिका प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून उचलला जात नसल्याने अखेर शिवसैनिकांनी फ प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी वसंत देगलूरकर यांना कचऱ्याने भरलेला बॉक्स गिफ्ट म्हणून दिला.
डोंबिवली पूर्वेकडील शिवमार्केट प्रभागात काही ठिकाणचा कचरा पालिका प्रशासन काही दिवसांपासून उचलला जात नसल्याची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी शिवसेना शाखाप्रमुख नाईक यांसह अनेक शिवसैनिकांनी मुख्य आरोग्य अधिकारी देगलूरकर यांची भेट घेतली. ज्या ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही तेथील कचरा एका बॉक्स मध्ये भरून शिवसैनिकांनी मुख्य आरोग्य अधिकारी देगलूरकर यांना भेट म्हणून दिला.
शिवसैनिकांनी आणि देगलूरकर प्रभागाची पाहणी केली. याबाबत शाखाप्रमुख नाईक म्हणाले , अनेक वेळेला पालिकेला कळवूनही जर पालिका लक्ष देत नसेल तर काय करायचे? नागरिकाच्या आरोग्याशी खेळाचे काम पालिका करीत आहे. तर मुख्य आरोग्य अधिकारी देगलूरकर म्हणाले, शिवसैनिकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पालीका प्रशासन नेहमी सदरच्या ठिकाणचा कचरा उचलत असते. दरम्यान शिवसेनेची एकीकडे आक्रमकता तर दुसरीकडे गांधीगिरी दिसून आली.
COMMENTS