शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक –  शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदार भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ तर अनिल कदम यांनीही बांधकाम ठेकेदाराने शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे़

ठेकेदार अनिल भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात आमदार अनिल साहेबराव कदम (रा़ओझर, ता़ निफाड) यांनी एसटी महामंडळाच्या निविदांच्या कारणावरून  मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़ भिडे यांच्या तक्रारीवरून आमदार कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आमदार कदम व भिडे या दोघांविरोधात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्णाची नोंद केली आहे़

COMMENTS