मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता मातोश्रीवर मंत्री आणि आमदारांची बैठक सुरू झाली आहे. शिवसेना आमदारांनी या पूर्वीही सेनेच्या मंत्र्यांविरोधातील नाराजी बोलून दाखविली होती. हे मंत्री आपल्याच आमदारांची कामे करीत नाहीत. त्यांच्या दालनात अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केली होती. यावर योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उद्धव यांनी त्यावेळी दिले होते. त्यामुळे आजची बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. त्यातच या बैठकीमध्ये शिवसेना मंत्री आणि आमदारांना मोबाईल फोन बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्री, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतील वादाची दृश्य़े सार्वजनिक झाली होती. त्यापार्श्वभूमीवर मोबाईल न बापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
COMMENTS