सांगली – शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार आणि सेना नेते सुयोग सुतार यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षाला रामराम ठेकला आहे.
निष्ठावंताना डावलुन मनसे मधुन शिवसेनेत आलेल्या संजय विभूते यांची जिल्हा प्रमुख, तर सांगली शहर प्रमुख मयूर घोड़के यांची निवड चुकीच्या पद्धतीने केली असा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे. सांगलीतील शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. या जन संपर्क कार्यालयावरील बोर्ड ही शिवसैनिकांनी काढून टाकला आहे.
सांगलीतील शिवसेना पदाधिकार्याणी ही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, उपजिल्हा प्रमुख अजिंक्य पाटिल, तालुका उपप्रमुख अनिल शेटे,शिव माथाड़ी जनरल सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क अध्यक्ष सचिन कांबळे, कुपवाड उपशहर प्रमुख सूरज कसलिंग. सांगली विभाग प्रमुख संतोष पाटिल या सर्वानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
COMMENTS