शिवसेनेच्या आंदोलनातील घोषणांना आशिष शेलारांचे तिखट उत्तर !

शिवसेनेच्या आंदोलनातील घोषणांना आशिष शेलारांचे तिखट उत्तर !

 

मुंबई – शिवसेनेनं आज महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. मुंबईत विविध 12 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते. नही चाहिये अच्छे दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याचवेळेला काही पातळीसोडूनही घोषणा देण्यात आल्या. त्यातून मोदींवर अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात आली.

या घोषणांवर संतापलेल्या आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवरही बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात तो दिर्घायुषी होतो असे म्हणतात. पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

COMMENTS