उस्मानाबाद – शिवसेनेचे उपनेते आमदारांनाच सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच संपर्क कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न केला. परंडा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना बोलावले नव्हते. याचाच राग मनात धरून ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्यासमोरच घोषणाबाजी करत खुर्च्यांची तोडफोड केली. परंडा तालुक्यातील शिवसेनेत गेल्या वर्षभरापासून शिवसेना उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यकर्त्यांत धुसफूस चालत आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
COMMENTS