शिवसेनेच्या बैठकीत मंत्री आणि जिल्हाप्रमुख भिडले !

शिवसेनेच्या बैठकीत मंत्री आणि जिल्हाप्रमुख भिडले !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या बैठीत मंत्री आणि जिल्हाप्रमुख एकमेकांशी चांगलेच भिडले. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मंत्री पक्षसंघटनेला महत्व देत नाहीत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत असा तक्रारींचा पाढा जिल्हाप्रमुखांनी वाचला. त्यावर मंत्र्यांनीही जिल्हाप्रमुखांना खडसावलं. आम्ही आमच्य कामांचा अहवला दर महिल्याला उद्धव ठाकरेंना देतो. त्यांना माहित आहे आम्ही काम करतो की नाही त्यामुळे तुम्ही असले आरोप करु नका या शब्दात त्यांनी जिल्हा प्रमुखांना सुनावलं.

COMMENTS