शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुखांना मारहाण

शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुखांना मारहाण

भांडुप – शिवसेना उपप्रचारप्रमुख शारदा जगदीशचन्द्र सरोज यांना मारहाण करण्यात आली आहे. भांडूपमध्ये लवकरच पोटनिवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही मारहाण करण्यात आल्याच बोल जात आहे.

शारदा सरोज त्यांच्या डोक्यात फरशी टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वार्ड क्रमांक 116 पोटनिवडणूकीच्या प्रचार संपून घरी गेल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

COMMENTS