शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, पेडणेकर-कुसळे समर्थकांची हाणामारी

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, पेडणेकर-कुसळे समर्थकांची हाणामारी

मुंबई –  शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या समर्थकांची प्रचंड हाणामारी झाली.

पक्षसंघटनेत झालेल्या बदलानंतर अनेक दिवसांपासून हा वाद सुरु होता. शिवसेनेत अनेकांना पदं डावल्याने रविवारपासून वरळी, डीलाईलरोड, भायखळा, प्रभादेवी, लालबाग परळ भागात अनेक शिवसैनिक नाराज होते. त्या नाराजीतून हा वाद उफाळून आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन शिवसैनिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

COMMENTS