शिवसेनेने ढोल बडवण्यापेक्षा डोके बडवून घ्यावे असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लागावला आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना येत्या सोमवारी राज्यभर सर्व जिल्हा बॅंकांसमोर ‘ढोलनाद’ आंदोलन करणार आहेत.
कर्जमाफी देताना शिवसेना काय करत होती. कर्जमाफीचा निर्णय झाला तेव्हा मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा संपूर्ण कर्जमाफी का घेतली नाही. शिवसेनेने ढोल बडवण्यापेक्षा डोके बडवून घ्यावे. असा टोला धनंजय मुंडेंनी लागावला.
धनंजय मुंडे यांनी स्वतःच् आधी आत्मपरीक्षण करावं आणि मग आमच्यावर टीका करावी. यांचे नेते मोदी अमित शहा यांच्या बरोबर सीक्रेट मीटिंग करतात तरी देखील शेतकऱ्यांसाठी काही होत नाही. यांनी आमच्यावर टीका करू नये. ढोल वाजवण्याचं आंदोलन हे बहिऱ्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी आहे. असे असं प्रतीउत्तर नीलम गोऱ्हे यांनी मुंडेंना दिल आहे.
COMMENTS