शिवसेनेने दुटप्पीपणा बंद करावा –  सुनील तटकरे

शिवसेनेने दुटप्पीपणा बंद करावा – सुनील तटकरे

‘सम्रुद्धी महामार्गसंदर्भात शिवसेनेने विरोध केला. एकीकडे विरोध करायचा आणि नंतर मोबदलाही वाटत फिरायचा हा दुटप्पीपणा शिवसेनेने बंद करावा. भूसंपादनाची रक्कम आदा करण्यासाठी मंत्र्यांची सही लागते असं मी पहिल्यांदाच बघतोय. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

‘शिवसेनेने राज्याभर ढोल बजाव आंदोलन केलं. मात्र कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने गावभर पोस्टर लावले आता ढोल कसले बडवता. नौटंकी करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नका’. असा टोलाही तटकरे यांनी सेनेला लागवला.

दरम्यान, 22 जुलैला अजित पवार या़चा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा दिन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाईल. या निमीत्याने गाव तिथं शाखा घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कार्यक्रम राबवला जाईल. अशी माहिती तटकरेंनी दिली.

COMMENTS