शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 563 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 563 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 337 व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 563 कोटी रूपयांच्या रायगड विकास कामांचा शुभारंभ 11 एप्रिल रोजी होणार आहे.
किल्ले रायगडावर होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमास राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास राज्यातील जवळपास वीस हजार शिवप्रेमी येणार असून, शाहिरी पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. राज्यातून आणलेल्या विविध नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस विभागातर्फे एकवीस फैरींची सलामी देण्यात येणार आहे, तसेच मराठा बटालियनचे बॅन्डपथक असणार आहे. गडावर भव्य पालखी सोहळा होणार असून जवळपास एक हजार ढोलताशांचा गजर होणार आहे. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचा सत्कार करण्यात येणार आहे.

COMMENTS