शेकडो कोटी रुपये केबीसी घोटाळा, तपास पूर्णतः थंडावला

शेकडो कोटी रुपये केबीसी घोटाळा, तपास पूर्णतः थंडावला

नाशिकमधून सुरु झालेला शेकडो कोटी रुपयांचा केबीसी घोटाळ्याचा तपास गेल्या काही दिवसापासून पूर्णतः थंडावला आहे.

कंपनीच्या कारभाराचा लेखाजोखा असणारी हार्डडीस्क आणि महत्वाचे कागदपत्र गेल्या दोन वर्षापासून फोर्नेसिक लँबमध्ये पडून आहेत. त्यामुळे तपास करावा तरी कसा आणि कुठल्या माहितीच्या आधारावर असा प्रश्न आर्थिक गुन्हे शाखेला पडला आहे.

गेल्या दोन चार वर्षांपासून नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यात केबीसी घोटाळा चांगलाच गाजतोय. हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणारा मोस्ट वाँटे़ड भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाणला गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी पकडण्यात आलं. मात्र राज्यभरातल्या फसलेल्या गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास होणार की काय अशी शंका उपस्थित केली जातेय.

COMMENTS