सोलापूर – शेतकरी कर्जमाफीचे अर्जात खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल. असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
COMMENTS