शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

यवतमाळ – सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी सोबतच काही अटी ही लादल्या आहे. त्यामुळे  अनेक शेतकरी कर्जमाफीत अपात्र ठरत असल्याचा आरोप करीत जि.यवतमाळ जिल्हातील बोथबोडन येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांनी आज मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी मागणी या शेतकरी विधवा महिलांनी केली.

शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या आदेशात अनेक अटी आहे. परिणामी शेतकरी अपात्र ठरत आहे. त्यामुळे या अटीशिथील करण्यासोबतच सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांची आहे. या मागणीसाठी शेतकरी महिलांनीच तिरडी उचलली. गावातील मुख्यठिकाणाहून अंत्ययात्रा स्मशानभुमीत पोहोचली या ठिकाणी कौशिक मेटकर महिलेनी भडाग्नी दिला.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडन येथे झाल्या आहेत. त्यानंतर अनेक राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी गावाला भेट दिली. त्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आर्ट ऑफ लिव्हींगचे श्रीश्री रविशंकर, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मनीशंकर अय्यर आदी नेत्यांचा समावेश आहे. नेत्यांच्या भेटीमुळे हे गाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते.

COMMENTS