शेतकरी संघटनेचा राज्यभरात चक्काजाम आंदोलन

शेतकरी संघटनेचा राज्यभरात चक्काजाम आंदोलन

शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा दिली आहे. प्रहार संघटनेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी वर्धा हिंगणघाट मार्गावर चक्का जाम केला.  मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.  या पुतळ्याला दहातोंडी रावणाचे स्वरूप दिले होते. सावंगी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक  केली . तर दुसरीकडे कोल्हार घोटी मार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू झालंय. अकोले येथे सुकाणू समितीचा रास्तारोको सुरू आहे. सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले आंदोलनात सहभागी झालेत.

बुलढाणा-  संपूर्ण कर्जमुक्तीसाठी खा.राजू शेट्टींच्या नेतृत्वात “रास्ता रोको”आंदोलन.. खा. राजू शेट्टी , रविकांत तुपकर सह शेकडो कार्यकर्ते राहणार उपस्थित संपूर्ण कर्जमाफी,स्वामी नाथन आयोगाची अमलबजावणी,पावसा अभावी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करा आदी मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर… जिल्ह्यात 14 ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरु आहे.

अमरावती – . सरसकट कर्जमाफी,  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून उत्पादन खर्चावर आधारित 50 ,℅ नफा पकडून गामीभाव घोषित करावा या व इतर मागण्या करिता अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाभिमानि शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने 10 ते 12 ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

अहमदनगर – हमाल पंचायत आणि शेतकर्यांचे चक्काजाम आंदोलन… नगर-पुणे महामार्गावर मार्केट यार्ड चौकात केले चक्काजाम आंदोलन… शेतकर्यांची कर्जमाफी व्हावी तसेच माथाडी कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन… आंदोलनात शेतकरी, माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी…

सातारा –  साता-यात सुकानू समितीच चक्का आंदोलन राष्ट्रीय महामार्ग अडवून सुकाणु समितीने केला चक्का जाम आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतल .

बीड – परळी-बीड मार्गावर तेलगाव व  गेवराई-बीड या महामार्गावर पाडळसिंग येथे शेतक-यांचा सकाळपासूनच रास्ता रोको सुरू असल्याने वाहतूक खोळंबली आहे. गेवराई तालुक्यात सुकाणू  समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जातेगांव फाटा, पाडळसिंग, चकलांबा व  कोळगाव येथे जक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे  100 बैलगाड्यासह शेतकरी रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत.

वर्धा – शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणासाठी प्रहार संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. भुगाव टी पॉईंटजवळ हे आंदोलन करण्यात आले.
हिंगोली :  कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे रास्तारोको सुरू आहे. नांदेड ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर हे गाव असल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

परभणी – बैलगाड्यांसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहे.  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने पोखर्णी येथे चक्का जाम करण्यात येत आहे. हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर उतरले….

जळगाव –  सोमवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र किसान सभेतर्फे अमळनेर येथे धुळे रस्त्यावर  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची होळी केली. विशेष म्हणजे खबरदारी घेत आंदोलकांनी शांतेत आंदोलन पार पाडले.

COMMENTS