शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.  पवारांनीच थेट मोदींची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकरी संपाची चर्चा आता दिल्लीत होत आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाने कोणत्याही एका राज्याला कर्जमाफी दिली तर इतरही राज्यात ती मागितली जाणारच आहे.तसेच महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसून शेतकऱ्यांचा आपल्या हक्कासाठीचा लढा आहे, असेही ते म्हणाले. केंद्राने शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर हातवर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पिकाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारला आहे.

 

शरद  पवार मोदींना नेमकं काय म्हणाले?

# युपीमध्ये कर्जमाफी दिली आहे मग महाराष्ट्रात द्या शरद पवार यांची मागणी…

कर्जमाफी आश्वासन युपीसाठी होते. इतर राज्यांसाठी नव्हते.  मोदींचे पवारांना उत्तर

# राज्यांतील परिस्थितीवर राज्य सरकार निर्णय घेईल. मालाचे नुकसान शेतकरी करणार नाही..  मोदी यांचे शरद पवार यांना उत्तर

# ‘हा शेतक-यांचाच संप आहे, राजकीय नाही..पोलीस बळाचा वापर केला जात आहे. खटले भरले जात आहेत. गंभीर गुन्हे लावले जात आहे.महाराष्ट्रात कर्जमाफी करायला पाहीजे… स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपने यात्रा काढली होती त्यात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते’ …. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

मात्र केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. हा निर्णय राज्यांनीच घ्यावा अशी भूमिका केंद्राने घेतली आहे.

COMMENTS