शेतकरी संपाला हिंसक वळण, सरकार मात्र मूक गिळून गप्प !

शेतकरी संपाला हिंसक वळण, सरकार मात्र मूक गिळून गप्प !

राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील रस्त्यांवर दुधाच्या नद्या वाहत असून रस्त्यावर भाजीपाला फेकून शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत. मात्र, याकडे सरकारने प्रतिक्रिया देण्याचं टाळ आहे. बळीराजा संपावर असताना सरकार शांत कसे बसू शकतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाऴ पासूनच संपाला हिंसक वळण लागलं होतं, तरीही सरकारकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही.  कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी संपावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

शेतकरी संपावर गेले असताना पुण्यात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रांजणगाव येथील “एमआयडीसी’मध्ये एका खासगी कंपनीच्या पहिल्या “मेड इन इंडिया’ चारचाकीच्या उदघाटनासाठी आले होते. उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पुन्हा व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलतील असे अपेक्षित होते मात्र  उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री नव्या कोऱ्या गाडीत बसले आणि स्वतःच मोटार चालवत कंपनीच्या प्लांटबाहेर पडले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर माध्यमांशी बोलण्याचं टाळून मुख्यमंत्र्यांनी तेथून पळ काढला .

 

COMMENTS