शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील – चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील शेतकऱ्यांवरील एकूण कृषी कर्जाचा आढावा घेण्यात येत आहे. शासनाने कर्जमाफीची तयारी सुरू केली असल्याची माहिती दिली. राज्यभरात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे, या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्याचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

सरकार कर्जमाफी देतानाच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीमुळे प्रचंड बोजा पडणार असल्याने इतर विकासकामे ठप्प होतील. या प्रश्नातून मुख्यमंत्री योग्य मार्ग काढतील तसेच सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

COMMENTS