शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची तरतूद !

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची तरतूद !

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभेत आज पुरवणी मागण्या सादर करण्यात आला असून एकूण 33 हजार 533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने सादर केल्या. राज्याच्या इतिहासातील सगळ्यात जास्त पुरवणी मागणी केल्या असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्या सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांकडून दबाव वाढविल्याने आणि विधिमंडळ अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची योजना आखल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांमध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एकूण 33 हजार 533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत  त्यापैकी 20 हजार कोटी रुपये हे कर्जमाफीसाठी आहेत.

कर्जमाफीचा 20 हजार कोटींचा आकडा वगळून इतर कामांसाठी 14 हजार कोटींची पुरवणी मागण्यात तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्या मांडण्याची सरकारवर वेळ आली आहे.

 

 

 

COMMENTS