मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.
पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱयांनी काल (मंगऴवारी) राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. राज ठाकरे यांनी पुणतांब्याला येऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे येत्या काही दिवसात पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱयांच्या नेतृत्वाखालीच हा लढा सुरु राहील अशी भूमिका बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.
मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी संपाचा आज शेवटचा दिवस असून, राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारने अल्पभूधारकांचे कर्ज माफ करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. मात्र राज्यातील सर्वचं शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांतर्फे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज शेवटचा दिवस असून यापुढेही आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे.
COMMENTS