नवी दिल्ली – संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली.
या भेटीमध्ये पवारांनी महाराष्ट्रातील समस्यांबाबत मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या चिंताजनक आहेत. साखर उद्योगही अडचणीत आहे. मोदींनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशा मागण्या पवारांनी मोदींकडे केल्या आहेत.
COMMENTS