मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांसाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्यात जवळपास सर्व पेरण्या झाल्या असून, अद्याप मदत मिळाली नाही, अशी माहिती शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांना राज्य सरकारने मदतीची रक्कमच दिली नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.
येत्या 24 तासांत ही रक्कम पाठवून द्यावी, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणीच होत नसल्याचे वास्तव मुख्यमंत्र्यांपुढे मांडले आहे. सरकारी आदेश असूनही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील नियम 79 (अ) चे उल्लंघन केले जात आहे. सहकारी बँका शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जाची रक्कम देत नसल्याचे आढळले आहे. ही बाब रावते आणि कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
COMMENTS