नाशिक – शेतक-यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सध्या विविध यात्रा निघत आहेत. विरोधी पक्षांनी कर्जमाफी आणि शेतीमालाच्या योग्य भाव मिळावा यासाठी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आसुड यात्रा काढली. शिवसेनेनं शिवसंपर्क यात्रा काढली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांची सध्या आत्मक्लेश यात्रा सुरू आहे. तर त्याला उत्तर म्हणून सरकारनं शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता शेतक-यांच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी दौरा करणार आहे. पुढच्या महिन्यात हा दौरा सुरू होणार आहे. विदर्भातील चंद्रपूरमधून या दौ-याची सुरूवात होणार आहे.
COMMENTS