शेतक-यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. शेतकरी संपाला पाठिंबा वाढत असून त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. आज वारक-यांनी शेतक-यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी हा वारकरी असून त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या बाजून लढू असा इशारा वारक-यांनी दिला आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये गिरणी कामगारांनीही शेतक-यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. गिरणी कामगार शेतक-यांसोबत असल्याचं गिरणी कामगारांनी स्पष्ट केलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनला पाठिंबा दिला आहे. अण्णा हजारे यांनीही शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतक-यांच्या अंहिसक आंदोलनला पाठिंबा आहे असं अण्णांनी स्पष्ट केलंय.
शेतक-यांच्या संपाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने आता संपाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वी विविधी शेतकरी संघटना, विरोधी पक्ष यांनी आपला पाठिंबा संपला दर्शवला आहे.
COMMENTS