नांदेड – ‘शेतक-यांनी कर्जमाफीच्या अर्जात शेतक-यांची जात विचारली जात आहे. महाराष्ट्रात 3 वर्षात 9 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे. असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या मोंढा मैदानावर झालेल्या जाहीर सभा म्हणाले आहे.
राहुल गांधी आज मराठावाडा दौ-यावर आले आहे. त्यावेळी ते म्हणाले, ‘काँग्रेस नेत्यांच्या दबावामुळे राज्य सरकारला कर्जमाफी करावी लागली. सरकारने सांगितले 35 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली पण प्रत्यक्षात फक्त 5 हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. नोटाबंदीनंतर 99% टक्के पैसा परत आला आहे. काळ्या पैशाविरोधातील नरेंद्र मोदींची मोहीम फेल ठरली आहे. देशाचे नुकसानीला पंतप्रधान मोदी जबाबदार आहे. 2 कोटी युवकांचा रोजगार कुठे गेला ? केवळ स्वप्न दाखवून चालणार नाही त्यांचे भविष्य दाखवा, 3 वर्षांपासून किती युवकांना रोजगार दिला ?’ असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
‘दुस-या पक्षातल्या लोकांना फोडून भाजपा पक्ष वाढवत आहे. पक्षाने आपल्या सर्वांना भरपूर दिले आहे आता आपण काँग्रेस पक्ष मजबूत करणे आपले कर्तव्य आहे. धर्मांध शक्तींना चले जाव सांगण्याची वेळ आली आहे. नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा आरोप ही राहुल गांधी यांनी केला आहे. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत.’ असे राहुल गांधी म्हणाले.
COMMENTS