शेतकऱ्यांकडून मूग,उडीद,सोयाबीन आणि कापूस हमीभावानुसार खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री केंद्रावर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन पणन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सोबत आधार क्रमांकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक तसेच सात बारा घेऊन जाणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला एसएमएस द्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येणार आहे. त्यादिवशीच शेतकऱ्यांना आपला माल खरेदी केंद्रावर न्यायचा आहे. या सुविधेमुळे शेतकरी बांधवांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल आणि खरेदी केंद्रांवर थांबावे लागणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या खरेदी केंद्रावर आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- शेतमाल खरेदीची वेळ एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कळवणार
- मूग,उडीद,सोयाबीन आणि कापूस हमीभावानुसार खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
- शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी
- शेतकऱ्यांनी सोबत आधार क्रमांकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक तसेच सात बारा घेऊन जाणे आवश्यक
- शेतकऱ्याला एसएमएस द्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येणार
COMMENTS