संघर्ष नाव ठेवून ‘संघर्ष यात्रा’ होत नाही – मुख्यमंत्री

संघर्ष नाव ठेवून ‘संघर्ष यात्रा’ होत नाही – मुख्यमंत्री

संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.  संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.  

कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन कवाडे, एमआयएम या सर्व विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा आयोजित केली आहे. आज पनवेलमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. चंद्रपूरमध्ये यात्रेला सुरुवात करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते लक्झरी एसी बसमधून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्ष यात्रेत नेत्यांचा शाही प्रवास सुरु असल्याची चर्चा सुरु होती. हा मुद्दा हेरत देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही. संघर्ष यात्रेत विरोधक लक्झरी बस आणि कारमधून रस्त्यावर उतरत नाही असा आरोप त्यांनी केला.

COMMENTS