सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राचा वादात आता काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे दिसेल तिथे त्याला फटके टाकणार’ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच संजय राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे,असंही निलेश यांनी म्हटल आहे. यामुळे हा वाद आता पुन्हा चिघळणार हे नक्की.
दरम्यान, ‘सामना’मधल्या वादग्रस्त व्यंगचित्राच्या वादावर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. व्यंगचित्रावर कार्टूनिस्ट प्रभूदेसाई यांनी माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नव्हत. त्यामुळे या वादावर आता पडदा पडलाय असं सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी अकारण वाद निर्माण केले जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचं हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
COMMENTS