शेतक-यांच्या राज्यव्यापी संपाला सर्वत्र उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या कानाकोप-यात आणि गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येतोय. भाजप वगळता सर्व पक्षाचे कार्यकर्ते या संपात उतरले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका दूध संकलनाला झाला आहे. कोल्हापुरातील गोकूळ दूध संघाने आजचे संकलन बंद ठेवले आहे. तसंच शेतक-यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोकूळ दूध संघाच्या दूधाचा मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुण्यात पुरवठा होता. त्यामुळे दोन्ही शहरात दूधाची टंचाई निर्माण झाली आहे. तर इतर दूध संघांनीही दूध संकलन बंद ठेवले असल्यामुळे रस्त्यांवरील टप-यांवर आणि काही हॉटेलमध्ये चहा मिळणंही मुश्कील झालं आहे.
COMMENTS