संभाजी ब्रिगेड – शेतकरी संघटनाकडून सरकारला गाढवाची उपमा

संभाजी ब्रिगेड – शेतकरी संघटनाकडून सरकारला गाढवाची उपमा

पुणे – राज्यभरातील शेतकरी विविध मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून संपावर आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार कुठली ही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.3) पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये सरकारला गाढवाची उपमा देत त्या गाढवाला निवेदन देण्यात आले. या वेळी सरकार हे गाढव असल्याच्या घोषणा देण्यात आल्या आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पवार म्हणाले, ज्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या ते भाजप पुरस्कत नेते आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. सरकारला जर खरच संप मिटवायचा असेल तर त्यांनी शेतक-र्यांमध्ये भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी करावी आणि तसे लेखी आदेश द्यावेत. अशी मागणी त्यांनी केली.

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, राज्य सरकार आंदोलन कर्त्या शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री असो, सदाभाऊ खोत, आणि पांडुरंग फुंडकर यांना शेतकरी हिताचे निर्णयच घ्यायचे नाहीत. जे गाजर सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी दाखवले होते तेच आताही दाखवले आहे. त्यामुळे सरकारने आश्वासन न देता लेखी स्वरूपात द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, शेतकरी संघनेचे विठ्ठल पवार, जोतिबा नरवडे, तानाजी गायकवाड, सुरेखा जुजगर, विलास सुर्यवंशी, सुरज सकट, आदी. शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS