नवी दिल्ली – संभाजी राजे आजपासून भाजपचे खासदार झाले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपचं सहयोगी सदसत्व स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतीही उपस्थित होते.
आता संभाजीराजे यांना थेट केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरु झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा मोर्चे सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंना मंत्रीपद देऊन, मराठा मोर्चाचं वादळ काही प्रमाणात शमवण्याचा सरकारचा हा प्रयत्न असेल, असं राजकीय जाणकारांचे मत आहे.
COMMENTS