लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसदेचे मान्सून सत्र सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर 16 जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांना सभागृहाच्या कामकाजावेळी सहकार्य करण्याचे आवाहन सुमित्रा महाजन करतील, असे समजते. ही बैठक संसदेच्या ग्रंथालय इमारतीत होईल, असे लोकसभा सचिवालयाकडून माहिती समजते.
विरोधी पक्षांचे नेते भारत-चीन सीमा वाद, काश्मीर स्थिती, शेतकर्यांचा संताप तसेच जीएसटी यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरवात होत असून, हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
COMMENTS